वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 10,000,00/- लाख कर्ज


वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादाः रु. १०.०० लक्ष पर्यंत

१. कृषी, संलग्न व पारंपारिक उपक्रमांसाठी

२. लघु व मध्यम उद्योगांसाठी अ) उत्पादन ब) व्यापार व विक्री

३. सेवा क्षेत्रासाठी

४. बँकेमार्फत लाभार्थीना रुपये १०,०० लक्ष पर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२% व्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात बैंक प्रमाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बैंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

अर्थसहाय्य मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता :

१. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा,

२. अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवगातील असावा.

३. अर्जदाराचे क्य १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.

४. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.

५. महामंडळाच्या www.vjnt.in या संगणक संकेत स्थळावर नाव नोंदणी अनिवार्य राहील. ६. अर्जदार कोणत्याही बँकेचा अथवा /वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

७. अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

८. कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

 मतदान कार्ड मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व माहिती भरा...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला भेट द्या

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महामंडळामार्फत लाभार्थ्यांस वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रक्कमेच्या अटी

१. जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.

२. लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.

३. उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्केच्या मर्यादेत) त्याचा आधार लिंक बैंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

४. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, या ऐवजी इतर कोणतेही Charges/fees अदा करणार नाही.

मतदार यादीत आपले नाव शोधा मोबाइल मधून १ मिनिटात.


अधिकृत वेबसाइट 


Jion Group

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.