पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी पोहोचले पाच लाखांवर PM Kisan Samman Nidhi
💥पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी पोहोचले पाच लाखांवर💥
👉त्रुटी केल्या पूर्ण : पेंडिंग एक लाख २५ हजार ई-केवायसीचा निपटारा
सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान योजना (पीएम किसान) हस्तांतरानंतर जिल्हा अधीक्षक कृषी खात्याने एक लाख ३६ हजार शेतकऱ्यांच्या पेंडिंग ई-केवायसी मार्गी लावल्या आहेत. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाच लाख ९ हजारांपर्यंत पोहोचली आहे. PM Kisan Samman Nidhi
केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात केंद्र शासनाचे सहा हजार रुपये थेट जमा केले जातात. शेतकऱ्यांसाठीची ही योजना अगोदर महसूल खात्याकडे होती. शेतकऱ्यांशी निगडित पीएम किसान योजना राबविताना अडचणी येऊ लागल्या.त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी महसूल व कृषी विभागात काही महिने वाद होता.शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी जास्तीत जास्त कृषी खात्याकडे असल्याने ही योजना जिल्ह्यात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाच लाख ८ हजार ९२० इतकी असून, त्यापैकी पाच लाख चार हजार २८१ ई-केवायसी पूर्ण झाल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण झालेल्यांपैकी चार लाख ९८ हजार ५९१ शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेत लिंक झाली आहेत. साडेचार हजार खाती ई- केवायसी पेंडिंग आहेत तर साडेसहा हजार खाती आधार लिंकसाठी पेंडिंग आहेत. महसूल खात्याकडून १५ जून २०२३ रोजी पीएम किसान योजना हस्तांतरित झाली. वर्षभरात दीड लाखापर्यंत पेंडिंग ई-केवायसी पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांचे स्वयं नोंदणी केलेले अर्ज पाछ-अपात्र करून कृषी आयुक्तांकडे पाठविण्याची आमची जबाबदारी आहे. त्रुटी पूर्ण करून शेतकऱ्यांना पात्र करण्याचे काम तालुका कृषी कार्यालयात केले जाते. ''PM Kisan Samman Nidhi''
Post a Comment