शत्रूला शोधून नायनाट करणार रोबोटिक श्वान

शत्रूला शोधून नायनाट करणार रोबोटिक श्वान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज, देशाच्या सीमांवर होणार तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशाच्या सीमांवर जवानांसोबत आता 'मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट' अर्थात रोबोटिक श्वान देखील तैनात करयात येणार आहेत. ते कोणताही उंच पर्वतापासून पाण्यात खोलवर जाऊन काम करण्यास सक्षम आहेत.

रोबोटिक श्वानांचा काही आठवड्यांपूर्वी लष्करी उपकरणांच्या प्रदर्शनात डेमो दाखविण्यात आला होता. त्यानंतर त्यांची लष्करासोबत चाचणी करण्यात आली. जैसलमेर येथील पोकरण फायरिंग रेंजमध्ये रोबोटिक श्वांनांनी सैन्याच्या बॅटल

एक्स विभागासोबत १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत युद्धाभ्यासही केला. त्यात १० श्वानांना सहभागी करून घेण्यात आले होते. शत्रुला शोधणे, शस्त्र नेणे, कॅमेऱ्याद्वारे शत्रुच्या ठिकाणांची माहिती देणे इत्यादी चाचण्या यावेळी करण्यात आल्या. भारतीय सैन्याने सीमेलगतच्या विशेषतः उंच ठिकाणांवर गस्तीसाठी १०० रोबोटिक श्वानांचा समावेश केला आहे. चीनने यापूर्वीच अशा श्वानांचा समावेश केलेला आहे. बर्फाळ प्रदेश, वाळवंट, उंच पायऱ्या तसेच पर्वतीय भागातील सर्व अडथळ्यांना पार करण्यास हे श्वान सक्षम आहेत.

काय आहेत वैशिष्ट्ये ?

  • १० किलोमीटर अंतरावरून नियंत्रित करणे शक्य आहे.
  • थर्मल कॅमेरे, रडार आणि शक्तिशाली ट्रान्समीटरने सज्ज.
  • कॅमेरा ३६० अंशात वळविणे आणि झूम करण्यास सक्षम.
  • शत्रुच्या ठिकाणांवर गोळीबार करण्याचीही क्षमता.
  • -४० ते ५५ अंश सेल्सिअस अंश तापमानात काम करण्यास सक्षम.
  • १५ किलो वजन उचलण्याची क्षमता.
  • तास चार्ज केल्यानंतर १० तास काम करु शकतो.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला भेट द्या

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोबोटिक श्वान कसे काम करतात?

हा एक प्रकारचा रोबोट आहे. त्यात अत्याधुनिक आणि अतिशय शक्तिशाली लेन्स व ट्रान्समिटर्स लावण्यात आले आहेत. त्याला चार पाय असून रचना श्वानांप्रमाणे आहे. शत्रुला शोधून त्यांना संपिवण्याचा युद्धाभ्यास करण्यात आला आहे.

*आमचे इतर ब्लॉग 

Pan Aadhaar Link Online | लास्टची संधी आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याची? 

जीवनात आरोग्य विमा का महत्वाचा आहे? आरोग्य विमा म्हणजे काय. Health Insurance

थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या 

पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी पोहोचले पाच लाखांवर PM Kisan Samman Nidhi

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.