Pm Kisan eKYC: ई-केवायसी कसे करावे
Pm Kisan eKYC: ई-केवायसी साठी शेतकऱ्यांना
आणखी एक संधी, ही तारीख लक्षात ठेवा
किसान सन्मान निधी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही त्यांना आणखी एक संधी दिली जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करण्याची शेवटची संधी दिली जात आहे. ई-केवायसी नसताना योजनेचा लाभ मिळणार नाही
केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) सुरू केली असून सदरील योजना संदर्भात क्रमांक (2) च्या शासन निर्णय कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत वहीतीधारक क्षेत्र असलेले शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी व 18 वर्षाखालील अपत्य) प्रति वर्ष रक्कम 6000/- लाभ दर चार महिन्यांनी 2000/- अशी वार्षिक समान्य तीन हप्त्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा केला जातो.
राज्यात पी.एम.किसान योजनेचे कामकाज
उत्कृष्टरित्या राबवले असल्याने या कामकाजाची नोंद देश पातळीवर घेण्यात आली तथापि
माहे मार्च 2021 पासून सदर योजनेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झालेला आहे. पी.एम.किसान
योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने शासन स्तरावर माननीय मंत्री(महसूल) व माननीय मंत्री(कृषी) व माननीय मुख्य सचिव
महाराष्ट्र राज्य यांनी या विविध संघटनाच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठक आयोजित
करून योजनेचे कामकाज सर्व विभागांनी समन्वयाने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि दंत नंतरही पी.एम.किसान योजनेचे कामकाज
सुरळीतपणे सुरू झालेले नाही.
सबब पीएम किसान योजना राबविण्यात येणाऱ्या
अडचणी विचारात घेऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत
सुधारणा करण्यात येण्याच्या प्रस्तावास दिनांक 30/05/2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेले
आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय
घेत आहे.
योजना नाव : |
पी.एम.सन्मान निधी योजना |
यांनी योजना सुरू केली होती : |
PM
नरेन्द्र मोदी |
फायदा : |
2000/- प्रति महिना (रु. 6000/- वार्षिक) |
लाभार्थी : |
गरीब
शेतकरी |
ताज्या बातम्या : |
ई-केवायसीसाठी सूचना |
E-KYC : |
पीएम किसान खात्यासह आधार कार्ड लिंक |
पीएम किसान ई केवायसी अपडेट करण्याचे मार्ग : |
Online(OTP
Based), आपले सरकार केंद्र (CSC सेंटर) |
पीएम किसान ई केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख
: |
31 ऑगस्ट
2023 |
चालू हप्ता : |
13 वा
हप्ता |
शासन निर्णय
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 15 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये
राज्यात राबविण्यात येत असून सदर योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन कोणताही
पात्र लाभार्थी प्रस्तुत योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये. याकरिता सदर
योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये
खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
Post a Comment