नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र २०२३

अखेर जीआर आला आता वर्षाला १२,००० रू. मिळणार  Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Maharashtra 2023

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना सुरू केली असून सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निष्कर्षानुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे संदर्भ  (1) च्या शासन निर्णयान्वय राज्यात राबविण्यात येत असून संदर्भ क्रमांक (2) च्या शासन निर्णयामुळे सदरील योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.

मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाचे उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी”  ही योजना राबविण्याबाबतची घोषणा केलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री कृषी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दिनांक 30/05/2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्याच अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

                      WhatApp ग्रुप जॉइन करा 

शासन निर्णय:-

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाचे उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना सन 2023-24 पासून खाली प्रमाणे राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे. सदरील शासन निर्णय, वित्त विभागाचा अनोपचारिक संदर्भ क्र.१२९/२०२३

सदर योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देह लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे राहतील.

1.सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात याव्यात.

2.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पी.एम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निष्कर्षानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिमाणाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. या बदलांकरिता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमत करण्यात आवश्यकता राहणार नाही

3.पी.एम.किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊ लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.

                    WhatApp ग्रुप जॉइन करा 

निधी वितरणाची कार्यपद्धती  

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या P.M.KISAN  योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्यामार्फत वितरित करण्यात येईल.

अ.क्र.

हप्ता क्रमांक

कालावधी

रक्कम

१.

पहिला हप्ता

माहे एप्रिल ते जुलै

रु.२०००/-

२.

दूसरा हप्ता

माहे ऑगट ते नोव्हेंबर

रु.२०००/-

३.

तिसरा हप्ता

माहे डिसेंबर ते मार्च

रु.२०००/-

अंक क्रमांक हप्ता क्रमांक कालावधी कॉमा रक्कम पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै 2000 दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2017 हप्ता डिसेंबर ते मार्च

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र २०२३  GR

✅आमचे इतर लेख 

👉तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

👉10वी नंतर काय करावे 

👉12 वी नंतर पुढे काय?

👉 महाराष्ट्र जनरल नॉलेज

No comments

Theme images by suprun. Powered by Blogger.